News

Home 9 News
अमृत महोत्सव समिती पारोळा अध्यक्ष पदी डॉ संभाजीराजे पाटील

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समिति जळगाव जिल्हा च्या वतीने पारोळयात विविध ठिकाणी भारत माता पूजन आणि महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ संभाजीराजे पाटिल, देविदासजी वाणी, एडवोकेट दत्ताजी महाजन, सीए मुकेश चोरडिया, एडवोकेट भूषण माने, आकाश बडगुजर, दौलत नाना पाटिल, एडवोकेट विशाल महाजन, एडवोकेट पराग शिरासमने, एडवोकेट हेमंत सोनवणे, प्रितेश जैन, राहुल निकम डॉ अनिल गुजराथी, डॉ विशाल शेंडे, बूंदे सर, रविन्द्र पाटिल, सोहोनी मैडम , रेखाताई चौधरी, डॉ सुदर्शन जैन, प्रकाश महाजन, माणिक जैस्वाल, सचीन शिनकर , रविन्द्र सोनार, शरद चौधरी, कैलास चौधरी, सारँग भावसार, नयन चौधरी , प्रजापिता ब्रम्ह कुमारी संस्थेच्या दीदी आदि अनेक मान्यवर उपस्थित होते

डॉ संभाजीराजे पाटील फौंडेशन मार्फत पूरग्रस्त गाव दत्तक

डॉ संभाजीराजे पाटील फौंडेशन मार्फत पूरग्रस्त गाव दत्तक घेण्यात आले.
नैसर्गिक आपत्ती ने करंजी ता पारोळा येथे थैमान घातले होते, यात अनेक घरांची पडझड, शेती नुकसान तथा मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली होती. पूर ओसरल्यानंतर गावकर्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता, परंतु डॉ संभाजीराजे पाटील फोंडेशन यांनी संपूर्ण वर्ष भरासाठी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून मोठा दिलासा देण्याचे काम करण्यात आले.
या सेवेसाठी गावकरी तथा समाजातील अनेक स्तरातील नागरिकांनी कौतुक केले

डॉ संभाजी राजे पाटील यांची वचनपूर्ती

पुराणे उधवस्त झालेलं कारंजी गाव, या संकटकाळात गावाची आरोग्य जबाबदारी घेण्याचा शब्द डॉ संभाजी राजे यांनी पूरग्रस्तांना भेट देताना दिला होता. त्याच जाणिवेतून आज कारंजी गावातील महिलेची मोफत प्रसुती साई हॉस्पिटल मार्फत करून देण्यात आली.
माहीला व बाळ दोघे सुखरूप असून या सेवेसाठी सर्व गावकरी तथा परिवाराकडून आभार मानण्यात आले.

डॉ संभाजी राजे पाटील फोंडेशन मार्फत लंम्पिआजाराबाबत जनजागृती

 

देशभरात पसरलेल्या लंम्पि आजाराने अनेक पशुधन बळी पडले आहे. त्यामुळे शेतकरी आणि पशुपालक हवालदिल झाल्याचे चित्र आहे. शासनाने आपल्या पशुची काळजी घेण्यासाठी लसीकरण आवश्यक असल्याचे म्हटले आहे परंतु शेतकऱ्यापर्यंत जनजागृती करणे देखील तेव्हढेच महत्वाचे होते.
या साठी डॉ संभाजीराजे पाटील फौंडेशन ने आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक खेड्यात जण जागृती रथ तयार करून लसीकरांबाबत जागरूकता निर्माण करण्याचे काम केले. त्यामुळे प्रशासनाला मदत झाली. यासाठी ग्रामीण तालुका आणि जिल्यातील पशु चिकित्सक यांनी फौंडेशन चे मनापासून आभार मानले.
खान्देश मध्ये लंम्पि आजार जनजागृती करणारा हा एकमेव रथ ठरला

डॉ संभाजीराजे पाटील यांच्या कार्याची दैसकाळ ने घेतली दखल

 

डॉ संभाजीराजे पाटील यांच्या कार्याची दैसकाळ ने घेतली दखल. 

श्री दत्त मंदिर संस्थान वैद्यकीय सेवा , चोरवड. ता पारोळा

 

 

श्री दत्त मंदिर संस्थान, चोरवड. ता पारोळा

पंचक्रोशीत प्रसिद्ध अश्या यात्रेसाठी ५ दिवस, २४ तास मोफत आरोग्य सेवा पुरवण्यात येते . जेथे गेल्या वर्षी १० गंभीर इजा, २८ सामान्य तसेच ३०० च्या वर रुग्णांना मोफत उपचार करण्यात आले.

श्री बालाजी नवरात्रोत्सव पारोळा मोफत आरोग्यसेवा

 

श्री बालाजी मंदिर संस्थान, पारोळा येथे होणाऱ्या देशभरात प्रसिद्ध असणाऱ्या यात्रेत लाखोंच्या  संख्येने सहभागी भाविकांसाठी मोफत आपत्कालीन व्यवस्था तसेच ऍम्ब्युलन्स सेवा डॉ संभाजीराजे फाऊन्डेशन मार्फत उपलब्ध करून देण्यात येते

पारोळा तालुक्यातील पहिली रक्तपेढी सुविधा

 

रक्त संकलन / रक्तदान शिबीर / योग साधना

पारोळा शहरातील पहिली रक्तपेढी तयार करून शहरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. त्याच बरोबर अनेक रक्तदान शिबीर घेऊन अनेक गरजूपर्यंत पोहोचाव्यात आले.

दर सहा महिन्यांनी रक्तदान शिबीर घेऊन गरजूना सहकार्य केले जाते.

सुदृढ निरोगी शरीरासाठी योग साधनेबाबत जनजागृती करण्यात येते आणि त्याचबरीबर योग साधना शिबीर आयोजित तथा प्रोत्साहित करण्यात येते.

MPJAY योजने अंतर्गत मोफत प्रसूती सुविधा, १५०० च्या वर मातांना लाभ

विभागातील MPJAY योजनेसाठी डॉ संभाजीराजे पाटील यांचे साई हॉस्पिटल, पारोळा  हे एकमेव केंद्र सेवेत होत. या योजने ला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला.

सुसज्य स्टाफ, प्रशस्त इमारत असलेल्या साई हॉस्पिटल मध्ये तब्बल १५०० पेक्षा जास्त प्रसूती या मोफत करण्यात आल्या.

मातृत्व हे संपूर्ण परिवारासाठी सुखदायी क्षण असतो, या सुरक्षित आनंदाच्या क्षणासाठी डॉ संभाजी राजे पाटील आणि सर्व स्टाफ यांचे घेतलेल्या मेहनत आणि सहकार्यासाठी अनेक लाभार्थ्यांनी मनस्वी आभार मानले.

मोफत मोती बिंदू शत्रक्रिया

 

फौंडेशन मार्फत ३००० च्या वर नागरिक यांचे मोफत डोळे तपासणी, त्याचबरोबर तब्बल ५२८ रुग्णाचे मोफत डोळ्याचे शत्रक्रिया करण्यात आले. ज्यात अनेक गरजू, वृद्ध, ग्रामीण भागातील नागरिकांना विशेष लाभ मिळाला. शत्रक्रिया झाल्यानंतर आरोग्य प्रतिनिधी पुढील अनेक काळ डोळ्यांच्या आरोग्यासाठी संपर्क साधत असतात

यात कासोदा , तळइ, उत्राण, निपाणे, जवखेडे, जळू, उंब्रे, मालखेडा, हनुमंतखेडा, फरकांडे, लोणी, खर्ची, पिंपळखेड, धोत्रे, आडगाव, मोंढाळे, भातखेडा, भोंडन, पिंपळकोठ. या गावात आतापर्यंत कॅम्प घेण्यात आले.

५०० झाडे संगोपन निर्धार

फोंडेशन मार्फत आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक वृक्षरोपण आणि संगोपन करण्यात आले आहे. त्यात शाळा , महाविद्यालये, ग्रामीण, दुर्गम भागात उपक्रम घेण्यात आला.

यात वड, निंब, उंबर, चिंच, अर्जुन, आंबा इ सारख्या उपयुक्त झाडांचा समावेश करण्यात आला.

येणाऱ्या काळात ५००० वृक्ष रोपं तथा संगोपन करण्याचा मानस आहे.

राजमाता जिजाऊ यांना डॉ संभाजी पाटील यांचे आदर्श अभिवादन

 

शिवबाराजे- शंभूराजे आज नसते तर आज माझा राष्ट्र माझा राज्य आणि मी आज कुठं असतो हा विचार देखील मनाला हादरवणारा होता. जिजाऊंनी शिवबांना फक्त जन्म दिला नाही तर खर्या अर्थाने शिवबा घडवला. तो त्यांच्या आदर्श अश्या विचारांनी. शिवबाच्या विचारातील महत्वाचा विचार म्हणजे “महिला सन्मान”.

 

डॉ संभाजीराजे पाटील फौंडेशन निमित्ताने आज मासाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद याना अभिवादनाचा नियोजित कार्यक्रम होता. फौंडेशन च्या सर्व सदस्यांमार्फत माँसाहेब आणि विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांच्या कार्याची माहिती देण्यात आली.

त्याच वेळी डॉ संभाजीराजे पाटील यांच्या श्री साई हॉस्पिटल जवळ दोन महिला दोन लहान मुलींसोबत स्वतःला चाबकाचे फटके मारत, डफ वाजवत, खेळ दाखवत पैसे जमा करत होते. डॉ संभाजी पाटील यांनी दुरून हे हेरले आणि त्वरित या महिलांना लहान मुलींना हॉस्पिटल ला बोलवण्याची सूचना करून.

त्यां दोन्ही स्रियांना साडी आणि तिन्ही लहान मुलींना त्यांच्या आवडीचे कपडे देऊन सन्मानित केले. त्यांना भविष्यातील वैद्यकीय मदतीसाठी आश्वस्त देखील केले. हा महिला सन्मान शिकवलाय रुजवलाय  तो माँ साहेबानीच. माँ साहेबांच्या जयंती दिनी या महिला आणि लहान मुलीच्या आयुष्यात काही सुखद प्रसंग देऊ शकलो आणि भविष्यात काही वैद्यकीय मदतीसाठी सेवा देऊ शकलो यापेक्षा दुसरा आनंद नाही

 

डॉ संभाजीराजे पाटील फोंडेशन माध्यम जरी असलो तरी प्रेरणा “माँ साहेबाची” आहे

 

त्या लहान मुली आणि महिला यांच्या चेहऱ्यावरचा आजचा आनंदात “माँ जिजाऊ” यांचा आशीर्वाद स्पष्ट दिसत होता.

गुरू रविदास यांच्या जयंती निमित्त डॉ संभाजीराजे फौंडेशन तर्फे अभिवादन

 

आपल्या अमृत वचनांनी प्रेम बंधुभाव समरसता यांची शिकवण देणारे गुरू रविदास। गुरू राविदासांची 41 भक्तीगीते आणि कवितांचा समावेश शीख धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिबमध्ये करण्यात आला आहे. 

आज करण्यात आले। फौंडेशन चे अध्यक्ष डॉ संभाजीराजे आर पाटील। यांनी संत रविदास यांच्या कार्याची माहिती दिली यावेळी  मा नगरसेवक श्री दीपक अनुष्ठान, रा स्व संघाचे श्री आकाश बडगुजर सर , श्री प्रितेश जैन तसेच मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक, समाजबांधव उपस्थित होते।

डॉ सँभाजीराजे पाटील फौंडेशन च्या माध्यमातून भातखेडे, एरंडोल येथे बैलगाडा शर्यत

बैलगाडा शर्यत, जवळपास 400 वर्षाची जुना महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ. शेतकऱ्यांच्या आवडता छंद म्हणून या शर्यतीकडे पाहिलं जातं। या पारंपरिक खेळामुळे अनेक देशी जनावरांचे उत्तम प्रकारे संगोपन केले जाते।

 

अश्याच स्व सागर भाऊ रायगडे यांच्या स्मरनार्थ आयोजित

डॉ सँभाजीराजे पाटील फौंडेशन च्या माध्यमातून भातखेडे, एरंडोल येथे बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती।

अनेक स्पर्धक आपल्या सर्ज्या सोबत सामील झाले होते। मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि गावकऱ्यांनी यांनी या खेळाचा आनंद लुटला।

 

या प्रसंगी  डॉ संभाजी राजे पाटील यांनी बैलगाडा हाकून कार्यक्रमाचे  उदघाटन केले तसेच  विजयी स्पर्धकांना डॉ संभाजी राजे पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आली।

जन्म शेतकरी कुटुंबात झाल्याने शेतकऱ्यांचा आनंदात सहभागी होऊन समाधान वाटले तसेच भविष्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी, आनंदासाठी  सहकार्याची भावना कायमस्वरूपी मनात रुजलेली आहे या शब्दात डॉ संभाजी राजे यांनी मनोगत व्यक्त केले।

यावेळेस दर्शन पाटील, गणेश कोळी, शाम पाटील, विशाल पाटील, विशाल गो. पाटील, रवी पाटील, पारस पाटील, दीपक पाटील, रवींद्र पाटील, मनीष पाटील, अजय पाटील, महेश जगताप, सुदर्शन पाटील,  वैभव पाटील, सोनू पाटील, मोनू पाटील, विकी पाटील, ज्ञानू पाटील शेतकरी गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

डॉ संभाजीराजे पाटील यांना खान्देश रत्न

 

सप्तरंग व स्टायलिंग स्टोन फौंडेशन मार्फत गौरव प्रदान

पारोळा शहरात साई हॉस्पिटल च्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देणारे तसेच डॉ संभाजीराजे पाटील फौंडेशन मार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविणारे प्रसिद्ध गायनोलॉजिस्ट डॉ संभाजी राजे पाटील यांना यावर्षीचा “खान्देश रत्न” पुरस्कार प्रदान करण्यात आला।

 

सप्तरंग व स्टायलिंग स्टोन फौंडेशन यांच्या मार्फत जळगाव येथे या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। वैद्यकीय सेवेबरोबरच पर्यावरण, कृषी, रोजगार, शिक्षण क्षेत्रातील कामाची दखल यावेळी घेण्यात आली। आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेणारी चित्रफीत या कार्यक्रम दरम्यान दाखवण्यात आली।