Social Work

Home 9 Social Work
वृक्षारोपण
  • 500+ Plantation
  • Schools/Villages/Rural/Grampanchayat/Farms
  • फोंडेशन मार्फत आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक वृक्षरोपण आणि संगोपन करण्यात आले आहे. त्यात शाळा , महाविद्यालये, ग्रामीण, दुर्गम भागात उपक्रम घेण्यात आला. यात वड, निंब, उंबर, चिंच, अर्जुन, आंबा इ सारख्या उपयुक्त झाडांचा समावेश करण्यात आला.
    येणाऱ्या काळात ५००० वृक्ष रोपं तथा संगोपन करण्याचा मानस आहे.
MPJY मोफत प्रसूति
विभागातील MPYJ योजनेसाठी डॉ संभाजीराजे पाटील यांचे साई हॉस्पिटल, पारोळा हे एकमेव केंद्र सेवेत होत. या योजने ला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला.
सुसज्य स्टाफ, प्रशस्त इमारत असलेल्या साई हॉस्पिटल मध्ये तब्बल १५०० पेक्षा जास्त प्रसूती या मोफत करण्यात आल्या.
मातृत्व हे संपूर्ण परिवारासाठी सुखदायी क्षण असतो, या सुरक्षित आनंदाच्या क्षणासाठी डॉ संभाजी राजे पाटील आणि सर्व स्टाफ यांचे घेतलेल्या मेहनत आणि सहकार्यासाठी अनेक लाभार्थ्यांनी मनस्वी आभार मानले.
मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया
फौंडेशन मार्फत ३००० च्या वर नागरिक यांचे मोफत डोळे तपासणी, त्याचबरोबर तब्बल ५२८ रुग्णाचे मोफत डोळ्याचे शत्रक्रिया करण्यात आले. ज्यात अनेक गरजू, वृद्ध, ग्रामीण भागातील नागरिकांना विशेष लाभ मिळाला. शत्रक्रिया झाल्यानंतर आरोग्य प्रतिनिधी पुढील अनेक काळ डोळ्यांच्या आरोग्यासाठी संपर्क साधत असतात
यात कासोदा , तळइ, उत्राण, निपाणे, जवखेडे, जळू, उंब्रे, मालखेडा, हनुमंतखेडा, फरकांडे, लोणी, खर्ची, पिंपळखेड, धोत्रे, आडगाव, मोंढाळे, भातखेडा, भोंडन, पिंपळकोठ. या गावात आतापर्यंत कॅम्प घेण्यात आले.
पुरग्रस्त गाव दत्तक योजना
  • Provided free health treatment for 1 year at Karanji
  • कारंजी तालुका पारोळा , येथे गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी मुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. या गावात मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि कष्टकरी असल्याने अतोनात हाल या गावकर्यांचे या नैसर्गिक आपत्ती ने केले होते.
    सामाजिक बांधिलकी ची जाण ठेऊन या गावात डॉ संभाजीराजे फौंडेशन यांनीं साई हॉस्पिटलच्या माध्यमातून वर्षभर वैद्यकीय सेवा मोफत करून दिलासा दिला. त्याच बरोबर इतर साहित्य मदत देखील या गावास करण्यात आली.
सामाजिक गुणगौरव
  • डॉ संभाजीराजे पाटील फौंडेशन मार्फत
    १. रांगोळी स्पर्धा
    २. निबंध स्पर्धा
    ३. वक्तृत्व स्पर्धा
    ४. शाळा, महाविद्यालय साहित्य वाटप
    ५. विद्यार्थी कला गुणवंत सत्कार तथा प्रोत्साहन कार्यक्रम
    ६. शेक्षणिक, सामाजिक, कला आधारित व्याख्यान सतत आयोजित केले जातात
Awards
  1. दैनिक दिव्य मराठी – कोरोना योद्धा 
  2. दैनिक सकाळ – आरोग्यनायक
  3. सप्तरंग – आरोग्यदूत
रक्त संकलन / रक्तदान शिबीर / योग साधना
  • पारोळा शहरातील पहिली रक्तपेढी तयार करून शहरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. त्याच बरोबर अनेक रक्तदान शिबीर घेऊन अनेक गरजूपर्यंत पोहोचाव्यात आले.
  • दर सहा महिन्यांनी रक्तदान शिबीर घेऊन गरजूना सहकार्य केले जाते.
  • सुदृढ निरोगी शरीरासाठी योग साधनेबाबत जनजागृती करण्यात येते आणि त्याचबरीबर योग साधना शिबीर आयोजित तथा प्रोत्साहित करण्यात येते.
मोफत आरोग्यसेवा – सामाजिक धार्मिक उत्सव
श्री बालाजी मंदिर संस्थान, पारोळा येथे होणाऱ्या देशभरात प्रसिद्ध असणाऱ्या यात्रेत लाखोंच्या संख्येने सहभागी भाविकांसाठी मोफत आपत्कालीन व्यवस्था तसेच ऍम्ब्युलन्स सेवा डॉ संभाजीराजे फाऊन्डेशन मार्फत उपलब्ध करून देण्यात येते
श्री दत्त मंदिर संस्थान, चोरवड. ता पारोळा

पंचक्रोशीत प्रसिद्ध अश्या यात्रेसाठी ५ दिवस, २४ तास मोफत आरोग्य सेवा पुरवण्यात येते . जेथे गेल्या वर्षी १० गंभीर इजा, २८ सामान्य तसेच ३०० च्या वर रुग्णांना मोफत उपचार करण्यात आले.