About
डॉ. संभाजीराजे पाटील
गरीब व गरजू रूग्णांची सेवा करणारे “डॉ संभाजीराजे पाटील फौंडेशन” पारोळा चे डाॅ. संभाजीराजे पाटील यांचे कर्तृत्व हे त्यांच्या नावाप्रमाणेच आहे.
आपलं शालेय शिक्षण देवगांव या छोट्याशा गावात करून पुढील शिक्षण अनुक्रमे अमळनेर(12वी) ,लोणी (MBBS) व धुळे(DGO,DFP) येथे पूर्ण केले.
प्रारंभिक वैद्यकिय सेवा:
रजिस्टार, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, धुळे
वैद्यकियअधिकारी:पाचोरा,भडगांव, मेहुणबारे व पारोळा
संचालक: श्री साई हाॅस्पिटल,पारोळा
अध्यक्ष: केवळाबाई बहुदेशिय संस्था,देवगांव
अध्यक्ष: डाॅ. संभाजीराजे पाटील फाऊंडेशन, पारोळा
त्यांच्या अथक प्रयत्नांतुन व सामाजिक जाणिवेच्या भावनेतून प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत शेकडो रूग्णांवर मोफत उपचार, शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अशा सर्व रुग्णांच्या कुटुंबाचा हजारो रूपयांचा खर्च त्यामुळे वाचला. त्यामुळे असे रूग्ण व त्यांचे कुटुंबीय यांच्या जीवनात यामुळे जणू प्रकाश आणता आला.
डाॅ. संभाजीराजे पाटील यांना त्यांच्या या असामान्य कार्याबद्दल विविध संस्थांच्या माध्यमातून गौरवण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दैनिक दिव्य मराठी तर्फे उत्कृष्ठ रूग्णसेवेचा पुरस्कार, उत्कृष्ठ आरोग्य सेवक म्हणुन दैनिक सकाळचा पुरस्कार,सप्तरंग संस्थेचा आरोग्यदूत सन्मान व कोविड योद्धा म्हणून गौरव असे अनेक सन्मान त्यांना लाभलेत.
याचं सर्व श्रेय श्री साई हाॅस्पिटल चे तसेच “डॉ संभाजीराजे पाटील फौंडेशन” चे सर्वेसवा डाॅ. श्री. संभाजीराजे पाटील व त्यांच्या टीमचं आहे. मुळातच, लोकांभिमुख विचार करून शासनाच्या योजनेंतर्गत मोफत , सुलभ व दर्जेदार वैद्यकिय सेवा गोरगरीब व गरजू रूग्णांना मिळाव्यात या उदात्त हेतुने डाॅ. संभाजीराजे पाटील यांनी वैद्यकिय सेवेचा हा वसा सुरू ठेवलाय. येणा-या काळात देखील त्यांचा हा रूग्णसेवेचा ध्यास श्री साई हाॅस्पिटल च्या माध्यमातून असाच सुरू राहील.
मानस:
आरोग्य/वैद्यकिय: सर्व गरजु, सर्वसामान्य नागरिकांना उत्कृष्ठ आरोग्य सेवा देणं. साई हाॅस्पिटल च्या माध्यमातून अत्याधुनिक आरोग्य सुविधा व उपचार नाममात्र शुल्कात ऊपलब्ध करून देवुन त्यांना इतर ठिकाणी जाऊन खर्चिक उपचार घेण्याची गरज उरणार नाही.
विद्यार्थी:
सर्वसामान्य परिस्थितीत शिक्षण घेणारे परंतु होतकरू व हुशार विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानत त्यांना त्यांच्या उपजत कलानुसार विदयाशाखा निवडण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणं; त्यांना रोजगारभिमुख कोर्सेस बद्दल मार्गदर्शन करणं तसेच त्यांना विविध स्पर्धा परीक्षांची(MPSC, UPSC, Staff Selection, Banking, Sale Tax, Talathi, Police इत्यादी) तयारी करण्यासाठी क्लासेस तसेच प्रशिक्षण वर्ग मुलाखत तंत्र आत्मसात करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करणं.
नौकरी/व्यवसाय:
तरूणांना रोजगार भिमुख शिक्षण व प्रशिक्षण देणं. नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळावे तसेच मार्गदर्शन शिबिर आयोजित करणं. व्यवसाय मार्गदर्शन तसेच विविध व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या उपलब्ध योजना लोकांपर्यंत पोहचवणं. तरूणांमध्ये उदयोगशीलता निर्माण करणं व त्यांना स्वावलंबी बनवणं. परिसरातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी MIDC उभारण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणं.
शेतकरी:
शेतकरी बांधव देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. कोरोना काळात शेती व्यवसायामुळे भारतीय अर्थव्यवस्था स्थिर राहिली.
शेतकरी बांधवाना शेतीविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान व शासनाच्या शेतीविषयक विविध योजनांची माहिती, प्रशिक्षण व शेती तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करणं. निर्यातक्षम दर्जाचे उत्पन्न घेण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहन देणं.
फळबाग लागवडीसाठी मार्गदर्शन, पेरू, केळी, सिताफळ,जिरॅनिअम कांदा यासारख्या पिकावरील उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन, परंपरागत शेती न करता प्रयोशील व मूल्यवर्धीत उत्पादन घेण्यासाठी प्रशिक्षण,शेती पुरक व्यवसाय तसेच शेती उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योगांची माहिती, व शासनाचे अर्थसहाय्य यासंदर्भात मार्गदर्शन करणं. प्रकल्प शेती ( Project Farm) या नव्या संकल्पनेवर आधारित शेती व्यवसाय करण्यासाठी तज्ज्ञांद्वारे योग्य मार्गदर्शन देणं. मत्स्यपालन तसेच कुकुटपालन, दुग्धव्यवसाय यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख शेतक-यांना करून देणं.
यांसोबत अनेक अशा योजना, संकल्पना विचाराधीन आहेत. आपल्या सर्वांच्या आशिर्वाद व शुभेच्छांच्या जोरावर बरंच काही करण्याचा मनोदय आहे